चिता आणि चिंता यात फक्त एका टिंबाचा फरक आहे असं मला माझ्या आजीनी फार लहानपणीच सांगितलं होतं. अर्थात माझ्या आजीनी स्वत: चिंतेत पीएचडी केली होती हे सांगायला नको. आजोबादेखील त्याच वर्गवारीतले. मी पहिल्यांदा अमेरिकेला आले तेव्हा मी पंधरा वर्षांची होते. तो प्रवास मी एकटीने केला. पण मी मुंबईहून कॅलिफोर्नियाला पोहोचेपर्यंत माझ्या बाबाला एकीकडे बायको आणि दुसरीकडे सासरेबुवा असा चिंता टेनिसचा सामना बघावा लागला होता. आईदेखील भयंकर चिंता करते. आमच्या घरात वारसाहक्काने चिंता दिली जाते. मी अगदी लहानपणीपासूनच खूप चिंता करायचे. लहान असताना आईला यायला उशीर झाला की मला तिला अतिरेक्यांनी पकडून नेलंय अशी (ती परत येईपर्यंत) खात्री असायची. मग मी दरवाज्यात भोंगा पसरून बसायचे. बाबामुळे आपल्याला शाळेला पोहोचायला उशीर होईल या चिंतेतदेखील मी कैक सकाळी वाया घालवल्या. गणितात नापास होण्याची चिंता तर मी अजूनही करते. एकूणच नापास होण्याची चिंता ही माझ्या आयुष्यातील महाचिंता आहे. पण चिंता करणा-या लोकांचा एक गुण असा आहे की ते इतर चिंतामाणींना अगदी ठामपणे चिंतेवर मात करायचे उपाय सुचवू शकतात. आणि "मला हे आयुष्यात खूप उशिरा कळलं म्हणून मी तुला सांगते", असंही असतं वरती.
ध्यान करणे (मराठीत मेडीटेशन) हा चिंतेवर जालीम उपाय आहे असं मला लहानपणापासून सांगण्यात आलं होतं. ध्यान करायचा पहिला प्रयोग मी चार वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात केला. तो अत्यंत असफल झाला हे सांगून काम होणार नाही. ध्यान करायच्या शिशुगटात जाण्याऐवेजी मी सरळ पीएचडीला बसले. दोन तास वेगवेगळे अवयव ढिले करत काय झालं पुढे काही समजलं नाही. अचानक एका फिरंगी तरुणीने "उठ आणि घरी जाऊन झोप" असं हलवून सांगितलं. उठल्यावर आजूबाजूचे इतर लोक तजेलदार झालेले दिसले. मी मात्र रात्री जास्त झालेल्या हवालदारासारखी उठले. माझं ते ध्यान बघून आजूबाजूच्या लोकांची चांगली करमणूक झाली असावी. मग आता यापुढे घरी सराव केल्याशिवाय अशा वर्गांना जायचं नाही असा मी पण केला. मग चिंतेवर मात करण्यासाठी मी सगळ्या प्रकारच्या ध्यानधारणेचा अभ्यास करू लागले.
फिरंगी लोक भारतीय संस्कृतीचं फिरंगायझेशन करण्यात तरबेज आहेत. जरा गुगलवर टिचकी मारली आणि माझ्या आजूबाजूला किती फिरंगी भारतीयांचा बुजबुजाट आहे हे लगेच माझ्या लक्षात आलं. ध्यान करणं उत्तम पण त्याजोडीला योगासनं करावीत असा मतप्रवाह दिसला. म्हणून मी आधी योगासनांच्या वर्गात गेले. भारतात मी दोनच प्रकारचे योगा असतात असं बघितलं होतं. पहिला प्रकार म्हणजे आजी योगा. हा प्रकार मी लहानपणी सकाळी उठल्या उठल्या आजीबरोबर करायचे. आणि दुसरा प्रकार म्हणजे छळ योगा. हा प्रकार सकाळी साडेपाचला उठून मी आई बाबांचे टोमणे झेलत करायचे. आमच्या ओळखीत एक काका योगासनांचे क्लास घ्यायचे. मिलिटरी मधून रिटायर झाल्यानंतर त्यांनी हे वर्ग सुरु केले होते. त्यामुळे योगासनं म्हणजे दर दहा मिनिटांनी बारा सूर्यनमस्कार असं मला वाटायचं. असे सूर्यनमस्कार घालून घरी आल्यावर बोलायचीही शक्ती राहायची नाही.
पण ऑस्ट्रेलियात "हाथा" योगा, "विन्यासा" योगा, "अष्टांगा" योगा, "कुंडलिनी" योगा, झालच तर "हॉट" योगा आणि पावर योगा असे विविध प्रकार ऐकायला मिळाले. माझे पुण्यातले योगा काका कधीही मृदु आवाजात,"कनेक्ट टु युवर इनर पीस" वगैरे म्हणायचे नाहीत. त्यामुळे अशा प्रकारची योगासनं करायला मला फार मौज वाटू लागली. त्याच दरम्यात भारतात करीना कपूर पावर योगा करून हडकुळी झाली होती. या सगळ्याचा परिणाम म्हणून मला योगासनं करायची सवय लागली. ती सवय अजूनपर्यंत नशिबानी टिकून आहे.
दुस-यांसमोर इज्जतीचा फालुदा होऊ नये म्हणून मी मेडिटेशनची पॉडकास्ट ऐकू लागले. सुरुवातीला वातावरण निर्मितीसाठी मी भारतीय सुगंधाच्या उदबत्त्या लावून, भारतीय रजई अंथरून पद्मासन घालून ध्यान करायला बसायचे. मग एक एक सूचना ऐकून त्याप्रमाणे मनाला वळवण्याचा प्रयत्न करायचे.
श्वास आत कसा जातो, बाहेर कसा जातो याचं निरीक्षण करता करता कधी कधी माझं विमान भलतीकडेच उडू लागायचं.
हम्म..आता मला माझं हृदय ऐकू येतंय..कसं ना! हृदय कायम चालू असतं. कुणी डिझाईन केलं असेल? असे पंप जर मनुष्य प्राण्याला बनवता आले तर सर्विसिंग नाही काही नाही! भारी.
शू!! चला आता परत ध्यान.
श्वास आत श्वास बाहेर. एक, दोन, तीन, चार..
जेवायला काय बरं करावं? किसलेल्या कोबीची कोशिंबीर? नको. कंटाळा आलाय डांएट करायचा. माझ्याच बाबतीत देवानी असं का केलं? कितीतरी लोक काय वाट्टेल ते खाऊन हडकुळे राहतात. माझ्याच नशिबी वजनवाढ का?
श्या. परत लिंक तुटली. श्वास आत, बाहेऽऽऽर! एक, दोन, तीन ..
कसला आवाज आहे हा? फ्रीज वाजतोय. कमाल आहे. हे जागेपणी कधीच लक्षात येत नाही. कशानी बरं वाजत असेल फ्रीज? शी! आणि टीप टीप काय आवाज येतोय? मला नळ गळलेले अजिबात आवडत नाहीत. बंद करावा का नळ? त्यापेक्षा टीप टीप तालावर श्वास घेऊया.
शुश! श्वास आत बाहेर. एक, दोन, तीन...
काही दिवसांनी या अशा फुटकळ ध्यानधरणेच्या जोडीला पॉझीटीव थिंकिंग सुरु केलं.
क्षमा, दया, शांती वगैरे जुन्या मराठी सिनेमातल्या नट्यांची जोपासना करायला सुरुवात केली. वाटतं खरं, पण या सगळ्या सात्विक विचारांनी अगदी दमायला होतं. मग कधी कधी माझं मन बुद्ध धर्माची ही कैद फोडून वाट्टेल तसा गोंधळ घालू लागायचं. लहानपणी एकदा आम्ही मांजराला कपाटात कोंडून ठेवायचा एक खेळ सुरु केला होता. त्यात अर्धा तास कपाटात कोंडलेलं मांजर बाहेर आल्या आल्या दिसेल त्या पहिल्या व्यक्तीला बोचकारायचं. तसंच माझं मनही या सात्विक विचारांच्या पिंज-यातून बाहेर आल्यावर दिसलेल्या पहिल्या व्यक्ती अगर वस्तूला नांगी मारायचं. मग काही दिवस मी त्याच्यावर संस्कार करायचे नाही. पण मग पुन्हा चिंताबाई सकाळच्या एसटीत बसून डोक्यात राहायला यायच्या. पुनश्च ध्यानधारणेचा निश्चय व्हायचा. पुन्हा उदबत्त्या बाहेर यायच्या.
हिंदू/बुद्ध धर्मात सांगितलेल्या पुनर्जन्माला सगळे नास्तिक पहिल्यांदा आरोपीच्या पिंज-यात उभं करतात. पण अशी किती वर्तुळं पुन्हा पुन्हा आपल्या एकाच आयुष्यात येत असतात. आणि अशी कित्येक छोटी वर्तुळं छेदून आपल्या आयुष्यातले छोटे छोटे मोक्ष आपल्या वाट्याला येत असतात. चुकांचे, चिंतांचे, संभ्रमाचे, आसक्तीचे असे कित्येक पुनर्जन्म या एकाच आयुष्यात पाहायला मिळतात. आणि दोन विचारांमधल्या त्या रिकाम्या जागेला लांबवण्यातच ध्यान करायची पहिली छोटी पायरी लपलेली असते. पण त्या जागा पकडायला नक्की मनाला चपळ बनवावं की त्याच्याकडे दुर्लक्ष करावं हेच कळत नाही. पण जेव्हा त्या जागा सापडतात तेव्हा अगदी नॅनो सेकंद का असेना, पण प्रार्थनेचं एक छोटंसं प्रतिबिंब आपल्या अंतरंगात दिसतं.
कधी कधी मनाला यशस्वीपणे गप्प बसवल्यावर आपण जेव्हा "मी" म्हणतो, तेव्हा आपण नक्की कशाला मी म्हणतो असा प्रश्न पडतो. मी म्हणजे अव्याहतपणे धडधडणारं हृदय आहे, माझ्या या जगातील अस्तित्वाला लय देणारा माझा वफादार श्वास आहे, की मला हे सगळं पुन्हा पुन्हा साठवून, गोठवून लिहायला लावणारं मन आहे? असे सुंदर, शांत विचार करताना जे मन माझी साथ देतं ते कधी कधी चिंतेच्या भोव-यात कसं काय अडकतं? आणि जसं माझ्या श्वासावर, हृदयावर मला बोट ठेवता येतं तसं माझ्या मनावर का बरं ठेवता येत नाही? आणि तरीही अदृश्यपणे माझ्या सगळ्या जाणिवांना, आनंदाला, चिंतेला आणि विचारला ते कसं काय स्वत:च्या काबूत ठेवतं?

शेवटचा प्यारा फारच गहन आहे. भलेभले यावर विचार करून थकले. Qualia?
ReplyDeleteबाकी योगासनांमध्ये शवासन सगळ्यात सोपे. :)
Ha ha..
ReplyDeleteMe pan vichar karun damliye. :(
I have a work out tshirt that says "I am just here for shavasana". :)