२०१० मध्ये रावण नावाचा सिनेमा काढण्यात आला होता. त्यात श्री. सौ ऐश्वर्या
राय यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या सिनेमा रिलीज
व्हायच्या आधीच्या मुलाखाती बघून मी तो सिनेमा न पाहण्याचा निर्णय घेतला.
(ऐश्वर्याला एक मिनिट षोडशवर्षीय मुलीसारखं खिदळायचे किती मिळतात हो?). पण
या चित्रपटाचं संगीत आमच्या लई लई फेवरेट रेहमानने दिलं असल्यामुळे गाणी
मात्र आम्ही आवर्जून ऐकली. अधून मधून नेहमी रेहमान प्लेलीस्टमध्ये "बेहने
दे", "रांझा रांझा" झालाच तर "बीरा" ही गाणी येतात. पण परवा अचानक बीरा या
गाण्यात कॅलक्यूलेशन मिस्टेक आहे असं माझ्या निदर्शनास आलं.
तर गाण्याचे बोल असे आहेत :
बीराऽऽ बीरा बीऽऽरा, बीरा बीरा, बीरा बीरा बीरा (वाचकांनी इथे हे गाणं उघडून ऐकणं अपेक्षित आहे)
बीरा के दस माथे, बीरा के सौ दांत !!
आता दस माथे म्हंटल्यावर सौ दांत कसे बरं? लगेच कुठल्या गाढवानी गाणं लिहिलं म्हणून गुगल केलं तर गुलझार!
रेहमानप्रमाणेच गुलझारवर देखील माझा जीव आहे. मग मी त्याचं समर्थन करायचा प्रयत्न केला. खरं तर दस माथे म्हणजे एकूण तीनशे वीस दात. अगदी आपण भारतीय रामभक्त म्हणून, "रावणाला अक्कल नव्हती", असं म्हंटलं तरी दोनशे ऐंशी तरी असायला पाहिजेत. त्यामुळे सौ अगदीच कमी आहेत. मग मी असा विचार केला की कदाचित रावण काहीच तोंडं जेवायला आणि बोलायला वापरात असेल. त्यामुळे तीन तोंडांना नीट दात आणि बाकी तोंडं बोळकी असा रावण डोळ्यासमोर उभा केला तर टचकन डोळ्यात पाणीच आलं. एवढ्या लंका सम्राटाला बोळकी तोंडं का म्हणून हो. शत्रू पण कसा रुबाबदार पाहिजे. बोळक्या रावणाला हरवण्यात रामाचं "माचोपण" कमी होईल ना. आणि सीतेचं पतीव्रतदेखील तेवढं इनटेन्स वाटणार नाही (काय हल्लीची पिढी ही! राम माचो म्हणे आणि इन्टेनसीटी ऑफ पतीव्रत?). मग असाही विचार केला की रावणाचे सगळे दात लढाईत पडले असतील. पण दात पाडणारी लढाई म्हणजे अगदीच कुस्ती वगैरे वाटते. रावण वॉज डेफीनेटली बेटर दॅन दॅट! माझ्या डोळ्यासमोर छान झुपकेदार मिशावाला, रसिक, कवी रावण आहे. "रम्य ही स्वर्गाहून लंका" म्हणणारा. तो काही कुस्ती बिस्ती खेळणार नाही. मग ते सौ दात सरासरी दहा असे सगळ्या तोंडात घातले. पण विरळ दातांचा रावण बोळक्या रावणापेक्षाही जास्त केविलवाणा दिसू लागला.
हे दाताचं गणित मांडताना माझ्या अचानक असं लक्षात आलं की मला रावणाबद्दल प्रचंड सहानुभूती आहे, आणि थोडा आदरदेखील. असं माझ्या आयुष्यात काय घडलंय ज्यामुळे मला रावणाबद्दल अशा भावना असाव्यात? या विचारांनी माझं मन व्यापून गेलं. जगातल्या सात्विक आणि तामसिक शक्तीचं अचूक अधोरेखन झालं पाहिजे असा आग्रह या भावनेमागे आहे की माझ्यातला रावण? आणि काय फरक पडतो? ऐक नं गप गाणं! एवढा उहापोह कशापाई? हेच चुकतं तुझं. तू सगळं ओव्हर अनॅलाइज करतेस. काही काही लोक कसे काहीही विचार न करता या टोकापासून त्या टोकापर्यंत जातात. तुझ्या या अतिविचारानीच तुझ्या आयुष्यातले सगळे पेच तयार झालेत. अतिविचार आणि अविचार ही एकाच असहायतेची दोन रूपं आहेत. हे जाण आणि मनावर ताबा ठेव.
या आणि अशा अनेक विचारांच्या खोल गर्तेत पडता पडता मी एकदा स्वत: बरोबर आकडा घालून ते गाणं म्हणायचं ठरवलं.
बीराऽऽ बीरा बीऽऽरा, बीरा बीरा, बीरा बीरा बीरा
बीरा के दस माथे, बीरा के तीन सौ बीस दांत !!
ते म्हणताना माझ्याच तोंडात कुणीतरी ज्यादा दात घातलेत असं वाटलं. मग लक्षात आलं मीटरचा प्रॉब्लेम आहे. मग माझ्या मनात तमिळ मधून हिंदीमध्ये त्याच चालीवर गाणं अनुवादित करणा-या गुलझारसाठी मायेचा पूर दाटून आला. थोडावेळ माझ्या डोक्यातल्या त्या दुष्ट शास्त्रज्ञानी ब्रेक घेतला. फारच हायसं वाटलं. एखाद्याबद्दल मनापासून प्रेम वाटायला लागलं की त्यांच्या दुर्गुणांची गोळाबेरीज करता येत नाही. प्रेमात ती फार मोठी शक्ती आहे. पण प्रॉब्लेम असा आहे (आहेच का परत?) की प्रेम, यु नो, इज व्हेरी टेम्पररी. लाईक अ चंचल हरीण इफ यु विल (असंच एक चंचल हरीण रावणानीदेखील वापरलं होतं! आम्ही पण महाभारत वाचलंय बरंका!).
जर प्रेम किती तरल आणि अत्तरवजा आहे ही देवदासाला कळलं असतं तर शाहरुखला त्या रूपात बघायची वेळ आपल्यावर आली नसती. इकडच्या व्हॅली गर्ल्सना जर देवदास ऐकवला तर त्या त्यांच्या घशाच्या कुठल्याश्या दरीतून निघणा-या त्या आवाजात, "ही वॉझ लाईक, सो लाईक टोटली अ लूझर" म्हणतील. एकूणच आता सगळीकडे प्रेम जुनं झालंय. त्यामुळे गुलझारबद्दल मला वाटणारं प्रेमदेखील उडून गेलं आणि परत ते शंभर दात मला चावू लागले.
शेवटी एक अगदी सोप्पा मार्ग निघाला. जेव्हा जेव्हा मला ते गाणं ऐकावसं वाटतं, तेव्हा मी ते तमिळमध्ये ऐकते. आणि मला तमिळ येत नाही आणि मी कधीही तमिळ शिकणार नाही या आनंदी भरवश्यावर मी माझ्या दुष्ट, कटकट्या आणि चिकित्सक मनाशी तडजोड केली. :)